Saturday, September 19, 2026

 संशय मर्यादा आणि राजकारण मर्यादा लेखक श्रीधर तिळवे नाईक


वास्तववादाचा माझ्यासाठी असलेला अर्थ असा आहे की हे ओळखणे की मी तात्पुरता आहे आणि वास्तव स्थायी आहे . वास्तव हे नेहमी माझ्या आधी होते आणि जे माझ्या नंतरही असणार आहे हे स्वीकारणे म्हणजे वास्तव स्वीकारणे होय दुर्देवाने अनेकदा आपण हे स्वीकारत नाही एकदा हे स्वीकारले की त्या वास्तवाशी कसे डील करायचे ते आपणाला कळायला लागते वास्तवाबाबतचा सर्वात मोठा प्रश्न हा नेहमीच वास्तव ओळखायचे कसे हाच असतो आपल्या इंद्रियांच्यावर आधारित आढळणारी संवेदने चित्तामार्फत आपण रिसिव्ह करतो आणि त्यानंतर आपली खरी कसोटी लागते कारण अनेकदा तुम्हाला आवडो अगर नावडो परंतु तुमची समोरच्या वास्तवाचे मुद्रण आणि त्याचबरोबर तुमच्या संवेदनशीलतेचे मुद्रण तुमचे चित्त तुमच्या मेंदूत करत राहते किंबहुना चित्ताची व्याख्या तीच आहे जेव्हा हे मुद्रण आपल्याला ठश्याच्या रूपामध्ये गोचर होते तेव्हा ते आपल्याला स्पष्ट कळते याला आपण म्हणतो संस्कार ! प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर संस्कार होत असतो आणि या संस्कारामधूनच आपली संस्कारशिलता ही तयार होते ही संस्कारशीलता कुठल्या गोष्टी आत घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टी सोडून द्यायच्या या संदर्भात सेंसर शिप लादायला लागते आणि हाच खरा डेंजरस गेम असतो जोपर्यंत तुम्ही संस्कारामध्ये म्हणजेच कंडिशनिंगमध्ये जगत असता तोपर्यंत तुम्ही अनेकदा अत्यंत प्रेडिक्टेबल रिस्पॉन्स द्यायला लागतात साहजिकच तुमच्या क्रेडिट टेबल रिस्पॉन्सवरून तुमच्या आसपासचे लोक सुद्धा तुम्हाला ओळखायला लागतात तुमची प्रतिमा तयार करतात आणि कधी कधी तर तुमची आयडेंटिटी सुद्धा यामुळे डिफाइन व्हायला लागते पण जेव्हा तुम्ही संस्काराच्या बाहेर उभे राहता व प्रतिसाद द्यायला लागतात तेव्हा तुमचा प्रतिसाद प्रेडिक्टेबर राहत नाही कारण तुम्ही संवेदनांना वर्तमान काळातला प्रतिसाद द्यायला लागता हा वर्तमानाचा प्रतिसाद अनेकांना पचत नाही कारण त्यांनी तुमच्याकडून अपेक्षित प्रतिसाद गृहीत धरलेला असतो आणि इथेच प्रतिमेचा खेळ येतो प्रतिमा निर्माणतेचा खेळ येतो तुम्ही एकदा का प्रतिमा निर्माण केली आणि त्यात अडकलात की तुम्ही तुमच्या प्रतिमेनुसार वागायला लागतात आणि हा तुमचा सर्वात मोठा पराभव असतो कारण इथे प्रतिमेने वास्तवावर विजय मिळवलेला असतो आणि इथेच खरी मेडिटेशन ची गरज भासते एकदा का तुम्ही तुमच्यावर झालेले संस्कार नीट बघायला लागला की मग थोडे वर्तमान काळात पाऊल टाकायला लागता 


कुठलीही गोष्ट जेव्हा समोर टक्करते तेव्हा सर्वात प्रथम तुमच्या मनामध्ये संशय निर्माण होतो हा संशय किती ताणवायचा यासंदर्भात कसलाही डाटा उपलब्ध नाही माझ्यामते आपण जिला मी डाऊट लिमिट संशय मर्यादा म्हणतो ती निश्चित करणे आवश्यक असते किंवा निश्चित करायला हवी. जर का आपण संशय मर्यादा आखून घेतली नाही तर आपण संशयाच्या इतके आहारी जातो की मग निर्णय घेणे कठीण होऊन बसते राजकीय क्षेत्रामध्ये संशय हा स्थायीभाव असतो साहजिकच आपल्या आसपासची माणसे आणि आपल्या विरोधातली माणसे नेमकी काय करत आहात करत आहेत याबद्दल सततचा संशय घ्यावा लागतो नाही घेतला तरी यायला लागतो आणि यातूनच राजकारणाचा आणि राजकारणी माणसाचा संशयकल्लोळ होत असतो 


आजच्या काळात जर कुठला फरक पडला असेल तर तो हा आहे की आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा हा संशय कल्लोळ हळूहळू अवतरखाना दिसतो आहे एका अर्थाने जे राजकारण फक्त सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खेळत राहायचे ते आता घराघरात शिरलेले दिसते साहजिकच राजकारणामुळे तयार होणारा सततचा हा संशय अलीकडे आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आणायला शिकलेलो आहोत एका अर्थाने आपण सर्व राजकीय व्यक्ती बनलेलो आहोत त्याचे कारण आपण स्वतःच राजकारण करत असतो आणि इतरांचे राजकारण आपल्याला खेळवत असते आपल्या नातेसंबंधातले राजकारण तर कोणी कल्पनाही केली नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात आयुष्य व्यापते आहे वास्तविक राजकारणापासून मुक्त असणारी एकमेव जागा ही आपली फॅमिली असते. अगदी मित्रांच्या संबंधात सुद्धा राजकारण सुरू शकते परंतु फॅमिली ही अशी गोष्ट आहे की जिथे आपण राजकारण दूर ठेवू शकतो आणि स्पष्ट आणि स्वच्छ एकमेकांशी बोलू शकतो एकमेकांच्या संशयाबद्दल बोलू शकतो आणि एकमेकाचे संशय निवारु शकतो किंबहुना कुटुंबाचा अर्थच असा झालाय की जिथे राजकारण नाही ती जागा म्हणजे कुटुंब होय. बाहेरच्या जगात राजकारण आपल्या आयुष्याला खेळवत असते अशावेळी बाहेर काय करायचे हा एक प्रत्येक कौटुंबिक माणसा पुढचा प्रश्न आहे दुर्दैवाने सर्वच नातेसंबंधात हे राजकारण आल्याने आणि हा संशय कल्लोळ आल्याने समोरच्या माणसाच्या राजकारणाची मर्यादा ही आपल्याला निश्चित करावी लागते या माणसाचे राजकारण किती काळ सहन करायचे ते आपण ठरवायचे असते आणि ह्या मर्यादेला मी पॉलिटिकल लिमिट म्हणतो राजकारण मर्यादा म्हणतो ही राजकारण मर्यादा सुद्धा ठरवावी लागते कारण आज कालच्या आयुष्यामध्ये तुमच्या आसपास अनेकदा लोक राजकारणी बनूनच वावरत असतात अनेकदा तर आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत सज्जन माणूस म्हणून प्रसिद्ध असलेल्या माणसाची किंवा आपल्याच कुटुंबातील एखाद्या सदस्याची आपणाला राजकीय बाजू खणखणीतपणाने माहीत असते अशावेळी नेमके काय करायचे हा एक फार मोठा प्रश्न असतो अशा वेळेला आपली राजकारणी मर्यादा आपण ठरवावी लागते मी स्वतःही मर्यादा 21 वर्षाची ठेवलेली आहे 21 वर्षे मी त्या माणसाला राजकारण खेळू देतो आणि एकदा का कळाले की हा माणूस काही सुधारण्यातला नाही की मग मी त्याचा परदापाश करतो त्याच्याविषयी स्पष्ट पणाने बोलायला लागतो हे बोलणे कोणाला रुचो अगर न रुचो मी स्पष्टपणे सांगतो 


थोडक्यात काय आजच्या काळामध्ये जगताना तुम्हाला एक संशय मर्यादा आणि एक राजकारण मर्यादा ठरवावी लागते ही जर का ठरवली नाही तर मग निर्णय घेणे अशक्य बनते कारण तुम्ही काही स्वतःचा सेपरेट संघ काढून बसलेले नसता किंवा तुम्ही स्वतःचा आश्रम सुद्धा काढून बसलेले नसतात जिथे तुमच्या हिशोबाने जग चालते जग हा काही आश्रम नाहीये किंवा बुद्धाचा संघपण नाहीये जिथे शास्ता तुम्ही आहात आणि तुमच्या हिशेबाने संघ चालतो आहे किंवा आश्रम चालतो आहे जग हे तुमच्यापेक्षा पूर्णपणे स्वतंत्र अस्तित्वात आहे ते जसे आहे तसेच बघावे लागते आणि जगात जगताना संशय मर्यादा आणि राजकारण मर्यादा ठरवणे अटळ बनते 


श्रीधर तिळवे नाईक