भेद साम विरुद्ध दंड दाम श्रीधर तिळवे नाईक
इस्लामचा अमेरिका आणि इंग्लंड मध्ये वाढत चाललेला आवाका आणि प्रभाव हा आता या देशांना चिंतेत टाकताना स्पष्टपणे दिसतो आहे . मुस्लिम मेयर आला तेव्हाच यासंदर्भात पोस्ट टाकली होती. आपल्याकडचे सेक्युलर लोक आंधळे असल्याने त्यांना त्यातला धोका कळला नाही . दुसरीकडे ब्राह्मणी हिंदुत्वाचे लोक आंधळी टीका करत होते आणि नेहमीप्रमाणे इस्लामचा वापर बहुजन समाजाच्या विरोधात करत होते या सगळ्यांमध्ये अनेकदा मग मुख्य मुद्दा गायब होतो तो इथे झाला .
खरा प्रश्न हा आहे की हा विजय इस्लाम नेमका कसा मिळवत आहे ? आपल्या स्वतःच्या देशातही इस्लामचा हा विजय आकार घेत आहे ही वस्तुस्थिती ! केवळ 40% जरी झालो तरी आम्ही 60% हिंदूंना हरवू हा आत्मविश्वास आहे आणि हा आत्मविश्वास उगाच आलेला नाही . सतत भेद करणाऱ्या संस्कृतीमध्ये हे सहज शक्य आहे कारण पूर्वीच मुस्लिम राजवटींनी हे सिद्ध केलेले आहे . इस्लामला विरोध करणारा माणूस पुरोगामी वादाच्या विरोधात असतो अशी पुरोगामी लोकांनी ठाम समजूत करून घेतलेली आहे आणि असा प्रसार सुद्धा ते इतरांच्यात करत असतात . आणखीन ४० वर्षांनी हे लोक अक्षरश : उताणे पडणार आहेत पण दुर्दैवाने त्याचा फार फायदा आपल्याला नाही . हिंदुत्वाला विरोध करायच्या नादामध्ये आपण त्यापेक्षा भयानक असलेल्या राजकीय आयडॉलॉजीला पाठिंबा देत आहोत हेच या लोकांना कळत नाही मी हे खूपदा सांगितलेले आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की धर्म ही राजकीय विचार प्रणाली आहे त्याचा मोक्षाशी काडीचाही संबंध नाही .
इस्लामला हे सर्व साधले कसे ? याचे स्पष्ट कारण असे आहे की इस्लामने दोन गोष्टी वापरलेल्या आहेत पहिली साम म्हणजे अतिशय गोड बोलणे आणि हे मुळातच मुस्लिम धर्माच्या प्रचारासाठी आवश्यक आहे हे कुराण सांगत असल्यामुळे नेहमी वापरता येण्याजोगे शस्त्र बनलेले दिसते आणि दुसरी गोष्ट अर्थातच भेद आहे आता तर अवस्था अशी आहे की पाकिस्तान ही न्यूक्लिअर सौदी अरेबिया ही धनाड्य आणि तुर्कस्तान मधले प्रशिक्षित अशी ताकद असलेल्या तीन इस्लामी कंट्रीज मध्ये युती झालेली आहे. याचा अर्थ ही सुरुवातीपासूनची स्ट्रॅटेजी होती .
मी स्वतः एक गोष्ट नेहमीच सांगत आलेलो आहे की माझ्यासाठी तुर्कस्तान हे कसोटी होती कारण हा देश केमाल पाशा सारख्या अत्यंत पुरोगामी नेतृत्वाने घडवलेला होता आणि जर का तो इस्लामच्या आखत्यारीत आला तर समजून जावे की इस्लाम सर्वच पुरोगामी वादांना गिळंकृत करणार आहे . प्रत्यक्षात तुर्कस्तान मध्ये हे नंतर घडलेले आहे आणि तिथे आता केमल पाशाचे कदाचित नामोनिशान सुद्धा राहणार नाही . हे लोक काय करणार त्याचे भविष्य सुद्धा अफगाणिस्तानमध्ये स्पष्ट झालेले आहे. अशा प्रकारच्या राजवटी आपणाला परवडणार आहेत की नाही हा खरा मुद्दे आहे पुरोगामी हिंदुत्व द्वेषाने इतके आंधळे झालेले आहेत की त्यांना ह्या गोष्टी स्पष्ट आणि स्वच्छ समोर असून सुद्धा दिसत नाहीत कदाचित आपल्या नातवंडांच्या पणतवंडाच्या वाट्याला जे येईल त्याची सुद्धा यांना कल्पना येत नाही .
याबाबतीत सर्वात आश्चर्यकारक काय असेल तर युरोपियन लोकांनी सरळ दाम आणि दंड यांची ताकद कमवून सुद्धा अमेरिका आणि इंग्लंड हारताना दिसत आहे ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती यावरून एकच गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे धनसत्ता आणि शस्त्रविद्या यांचा कितीही विकास झाला तरी जेव्हा प्रश्न धर्माचा येतो तेव्हा भावनाच महत्त्वाची ठरत जाते . त्यामुळेच धर्माचा मुकाबला करता येणे अशक्य होऊन बसते कारण धर्माचे सर्वात मोठे हत्यार माणसा मधले भय असते माणसा मधल्या इमोशन्स असतात यांना वाटेल तसे मॅनेज करता येते मॅनेफ्युलेट करता येते फक्त मॅन्युफ्युलेट करणारे एकत्र असावे लागतात तसे इस्लाम मध्ये एकत्र असतात आणि एका विशिष्ट पद्धतीने प्रत्येक मुसलमान हा धर्मप्रचारकच असतो कारण त्याच्याकडून एक जरी माणूस धर्मांतरित झाला तरी त्याला स्वर्ग मिळणार याची गॅरंटी देण्यात आलेली आहे त्यामुळे असा मनुष्य कधी दृश्य असतो तर कधी अदृश्य कधी गोड बोलतो तर कधी व्यवस्थित त्याला जे बोलायचे आहे ते बोलतो कधी धमकावतो कधी खूप मोठी आशा दाखवतो अल्पसंख्यांक असताना भेद साम आणि बहुसंख्यांक झाला की दंड आणि भेद ही एक पॉलिसी खुद्द महमद पैगंबर यांच्या संपूर्ण धार्मिक धोरणामध्येच होती तीच आता राबवली जात आहे . अमेरिका आणि इंग्लंड मध्ये राबवली गेली आहे भारतात यापूर्वी ती राबवली गेली होती . आपल्याकडे जे पुरोगामी लोक मुस्लिम कालखंडाचा इतिहास जो मुस्लिम लोकांनीच लिहिलेला आहे नीट वाचत नाहीत .
त्यातच पुन्हा इस्लामफोबिया सारखे आणि घटनात्मक स्वातंत्र्यासारखे मुद्दे इस्लाम अतिशय प्रभावीपणाने आपल्या विरोधकांच्या संदर्भात वापरत असतो एकंदरच अनेकदा असे होते की रानटी टोळ्या सभ्य संस्कृतींच्यावर विजय मिळवतात जगामध्ये पुन्हा एकदा तेच घडले तर आश्चर्य नाही मिळवलेली सगळी प्रगती मातीमोल करण्याची ही सांस्कृतिक सवय आजचीच नाही तिचाही एक फार मोठा इतिहास आहे . भारतामध्ये सिंधू संस्कृती प्रगत असून सुद्धा ब्राह्मण लोकांनी नंतर स्वतःचे वर्चस्व निर्माण केलेच ग्रीक फिलॉसॉफी काळाच्या दृष्टीने आणि मर्यादित छान असून सुद्धा रोमन लोकांनी मात केलीच चंगेज खान सुद्धा शेवटी यशस्वी झालाच तेव्हा आपण सभ्य आणि प्रगत असलो म्हणजे टिकू हा जो काही पुरोगामी लोकांचा भ्रमनिरास आहे किंवा आपण शिक्षण आणि समाज सुधारणा यांच्या माध्यमातून मत परिवर्तन घडवून आणू हा जो काही त्यांचा पोकळ आशावाद आहे तो ओसरेपर्यंत वेळ निघून गेलेली असणार आहे
एका बाजूला ब्राह्मणी हिंदुत्व आहे ज्याला फक्त आपल्या धर्माच्या प्रचारासाठीच इस्लाम कार्ड म्हणून वापरायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला आंधळे पुरोगामी लोक आहेत ज्यांना मत मिळावीत म्हणून इस्लाम बरोबर युती करायची आहे यामध्ये नेहमीप्रमाणे मधला बहुजन समाज मारला जाणार आहे मुस्लिम लोकांच्या राजवटीत तो तसा आधी मारायला गेलाच होता आता त्याची उजळणी झाली तर आश्चर्य मानायचे कारण नाही .
श्रीधर तिळवे नाईक
No comments:
Post a Comment